पाकिस्तानच सर्वोच्च नागरी सन्मान कतारच्या अमिरना प्रदान

इस्लामाबाद- पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान “निशान ए पाकिस्तान’ कतारचे आमिर शेख तमिम बिन हमाद यांना प्रदान करण्यात आला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांच्या हस्ते एका समारंभामध्ये आमिर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

दोन्ही देशांनी व्यापार, वित्तीय गुप्तवार्ता, आर्थिक अफरातफरविरोधी आणि दहशतवाद्यांच्या अर्थसहाय्याविरोधात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळ पातळीवर झालेल्या चर्चेदरम्यान व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि वित्तीय गुप्तचराशी संबंधित तीन सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वणिज्य सल्लागार अब्दुल रझाक दाऊद आणि कतारचे अर्थमंत्री अली शरीफ अल एमादी यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केला. कतारकडून पाकिस्तानला अलिकडेच आर्थिक सहकार्यही मिळाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here