पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; पाकने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय जवान धारातीर्थी

जम्मू काश्मीर- गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या असून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. अशातच आज पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारताला डिवचले.

जम्मू आणि काश्मीरच्या सुंदरबनी भागामध्ये आज पाकिस्तान सैन्याकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय जवानाला वीर मरण आले आहे. जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी भागामध्ये तैनात असलेले 24 वर्षीय भारतीय जवान यश पॉल हे पाकिस्तान सैन्याकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात धारातीर्थी पडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)