#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक 

बेंगळूरु – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक केल्याबद्दल कर्नाटकातील एका खासगी शाळेच्या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. जिलेखा बी असे या शिक्षिकेचे नाव असून त्या बेळगावीमधील शिवपुरा इथल्या एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत. “पाक की जय हो’ असा मेसेज त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांना स्थानिक न्यायलयामध्ये हजर करण्यात आल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावली, असे पोलिसांनी साम्गितले.

जिलेखा बी यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता. त्यांच्या घराभोवती जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी बी यांच्या घरावर दगडफेक केली आणि घराला आग लावण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बी यांना आणि आंदोलक विद्यार्थ्यांनाही अटक केली.

गुरुवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर कर्नाटकमध्ये अशाप्रकारे सोशल मिडीयावर पाकिस्तान समर्थक पोस्ट टाकल्याबद्दल अटक झाल्याचे हे दुसरे उदाहहरण आहे. यापूर्वी बेंगळूरु शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या ताहिर लतिफ या मूळ काश्‍मीरी विद्यार्थ्यानेही जैशच्या दहशतवाद्यांचे कौतुक करणारा मजकूर पोस्ट केला होता. पुलवामाचा स्फोट घडवणारा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दर आणि शहिद जवानांच्या फोटोंचे स्क्रीनशॉट व्हॉटस ऍपवर पोस्ट केले होते. त्याने आदिल अहमदचे कौतुकही केले होते. त्यालाही शनिवारी अटक करण्यात आली आहे.
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फेसबुकवरील त्याची आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)