भारताच्या दबावानंतर पाकिस्तानची कारवाई ; ‘जैश-ए-मोहम्मद’चे मुख्यालय घेतले ताब्यात

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या दबावामुळे पाकिस्तानने दहशतवादी मसूद अझहरवर पकड घट्ट केली आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणावर कारवाई केली. तसेच त्यांचे मुख्यालय सुद्धा पाकिस्तानने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर कारवाई केली आहे. बहावलपूरमधील मदरिसुल सबीर आणि जामा-ए-मस्जिद सुबनुल्लाह हे परिसर सरकारे नियंत्रणात घेतले आहेत. दहशतवादी मसूद अझहर जश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख असून पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदचा आतंकवादी आदिल अहमद दार यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारताच्या सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)