पाक नागरिकांना बिकानेर सोडण्याच्या सूचना

बिकानेर – पुलवामा चकमकीत एका मेजरसह पाच जवानांना वीरमरण आले. शहिदांमध्ये राजस्थानमधल्या एस. राम यांच्या नावाचाही समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमारपाल गौतम यांनी एक लिस्ट जारी केली आहे. तसेच त्यांनी सीआरपीसी 144 कलम लागू केल्याची माहितीही दिली आहे.

पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांच्या आत जिल्हा सोडावा, असेही बिकानेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच बिकानेर हद्दीतील हॉटेलवाल्यांना पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्यावरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांसाठी हे आदेश लागू केले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पिंगलान भागात झालेल्या चकमकीत एस. राम शहीद झाले, त्यांचे पार्थिव काल राजस्थानमध्ये आणले गेले. 18 तास सुरू असलेल्या या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स आणि पॅरा फोर्सेसच्या टीमने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)