जयपूर तुरूंगात कैद्यांमधील हाणामारीत पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू 

जयपूर – राजस्थानमधील जयपूर मध्यवर्ती कारागृहात बुधवारी कैद्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात एक पाकिस्तानी दहशतवादी मृत्युमुखी पडला. शाक्रुल्लाह (वय 50) असे त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता.

तुरूंगातील आवाज कमी करण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी काही कैद्यांनी मोठ्या दगडाने शाक्रुल्लाहवर प्रहार केले. त्यात तो मृत्युमुखी पडला. तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच ही घटना घडली. त्या घटनेची पोलिसांबरोबरच न्यायदंडाधिकारी चौकशी करणार आहेत. दरम्यान, शाक्रुल्लाह याला जयपूर तुरूंगातील विशेष सेलमध्ये 2011 पासून ठेवण्यात आले होते. त्याआधी तरूणांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याच्या आरोपावरून शाक्रुल्लाह याच्यासह आठ जणांना पंजाबमधील तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्यांना राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शाक्रुल्लाहला 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)