पाकिस्तानी प्रवक्‍त्याचा ट्विटर अकाऊंट निलंबित – भारताच्या तक्रारीचा परिणाम

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉक्‍टर मोहम्मद फैजल यांचा वैयक्तिक ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आला आहे. भारताने मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्‌विटरकडे तक्रार केल्यानंतर ट्‌विटरने मंगळवारी रात्री ही कठोर कारवाई केली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानमधील एका पत्रकाराने देखील आपल्या ट्विटर हॅंडलवर शेयर केली आहे. पुलवामा येथीअ सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्वच मार्गांनी जगाला पाकिस्तानचे खरे स्वरूप उघडे करून दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

मीडियात आलेल्या माहितीनुसार ट्विटरने भारत सरकारच्या तक्रारीवरून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांचा वैयक्तिक ट्विट्‍र हॅंडल @DrMFaisal N निलंबित केला आहे. डॉ. फैजल कुलभूषण जाधव प्रकरणाची माहिती सतत आपल्या ट्विटर हॅंडलवर शेयर करत होते. त्याचप्रमाणे काश्‍मीरसंबंधीही ते ट्विटरवर टिप्पणी करत होते. कुलभूषण जाधवची केसची सुनावणी सध्या हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)