पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय निवासी भागांवर मारा

जम्मू: पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी धुमाकूळ घालत भारतीय निवासी भागांवर मारा केला. त्या नापाक कृत्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या शाळा बंद करण्यात आल्या.
पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी 9.30 च्या सुमारास नौशेरा क्षेत्रात मारा सुरू केला. त्यांनी एलओसी लगत असणाऱ्या खेड्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. तो तब्बल पाच तास चालू राहिला. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

सावधगिरीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने त्या परिसरातील सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ते पाऊल उचलण्यात आले. सुदैवाने, पाकिस्तानी माऱ्यात भारतीय बाजूची कुठली हानी झाल्याचे तातडीचे वृत्त नाही. पाकिस्तानी सैनिकांच्या आगळिकीला भारतीय लष्कराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा करतात. त्याचा लाभ उठवून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जातो. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांच्या ताज्या धुमाकूळानंतर घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावण्यसाठी भारतीय जवानांनी एलओसी लगतची गस्त वाढवली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)