पाकिस्तानी उच्च न्यायालयाकडून नवाज शरीफ यांना दिलासा 

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. नवाज शरीफ यांनी न्यायालयात सुरु असलेले प्रकरण दुसऱ्या न्यायालयात स्थानांतरित करण्याबाबत याचिका केली होती. ही याचिका स्वीकारत पाकिस्तानी उच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना दिलासा दिला आहे. 
नवाज शरीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची चार प्रकरणे सुरु आहेत. पनामा पेपर प्रकरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालायाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने कोर्टात याचिका दाखल केली होती. पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले. आता त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आल्याने त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या अडचणीत भर पडली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)