पाकिस्तानील ख्रिश्‍चन महिलेची ईश्‍वर निंदेच्या आरोपातून सुटका 

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

इस्लामाबाद  – ईश्‍वर निंदा केल्याच्या कारणावरून सन 2010 मध्ये खालच्या कोर्टात फाशीची शिक्षा झालेल्या ख्रिश्‍चन महिलेची सर्वोच्च न्यायालयाने या आरोपातून आज निर्दोष सुटका केली. असिया बिबी असे या महिलेचे नाव आहे. तिची शेजाऱ्यांशी भांडणे झाली होती त्यावेळी तिने इस्लामचा अपमान केल्याची तक्रार तिच्या शेजारच्या लोकांनी तिच्या विरूद्ध दिली होती. त्यावरून तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या खटल्यामुळे पाकिस्तानात मोठाच गहजब उडाला होता. ईश्‍वर निंदेच्या आरोपाला फाशीच्या शिक्षेखेरीज दुसरा कोणताच पर्याय असू शकत नाही अशी भूमिकाघेत इस्लामिक कट्टरपंथीयांनी या शिक्षेचे जोरदार समर्थन केले होते. असिया बिबीला सन 2009 मध्ये ट्रायल कोर्टाने आणि सन 2014 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने फाशी सुनावली होती. या निकालाला तिने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे तत्कालिन राज्यपाल सलमान तासीर यांनी सन 2011 मध्ये असिया बिबीचे समर्थन करून देशातील ईश्‍वर निंदाविषयक कायदाच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती त्यामुळे राज्यपालांचीच हत्या झाल्याने हा विषय देशभर संवेदनशील बनला होता. इस्लामची िंनंदा केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा पाकिस्तानात झिया उल हक यांनी सन 1980 मध्ये केला आहे. तथापी व्यक्तीगत वादात दुसऱ्याला हानी पोहोचवण्यासाठी किंवा त्याचा सूड उगवण्यासाठी या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. दरम्यान असिया बिबींची कारागृहातून सुटका होईल पण त्यांच्या जीवाला आता इस्लामिक कट्टरपंथीयांकडून मोठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)