#ICCWorldCup2019 : भारताच्या विजयासाठी पाकिस्तानी कर्णधाराच्या मामाचं साकडं

एटा – उद्या भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विश्वचषकामध्ये एकमेकांना भिडणार असल्याने क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विश्वचषकाच्या इतिहासामध्ये पाकिस्तानसोबत आजतागायत एकही सामना गमावला नसल्याने टीम इंडियाचा ‘जोश’ हाय आहे. उद्या पाकिस्तानसोबत सामना असल्याने भारतीय फॅन्स देखील सोशल मीडियावर आपल्या टीमला जोरदार चिअर करत असून टीम इंडियाचं हा सामना जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत.

अशातच आता पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याचे मामा महमूद हसन यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान उद्या होणाऱ्या सामन्यामध्ये भारताने विजय संपादित करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याचे मामा महमूद हसन हे उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवाशी असून ते या सामन्यामध्ये भारतीय संघासाठी चिअर करीत आहेत. ते म्हणतात, “या सामन्यात माझा भाचा असलेल्या सर्फराजने चांगली कामगिरी करावी मात्र या सामन्यात विजय भारताचाच व्हावा.”

महमूद हसन यांच्या मते जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो त्यावेळी त्यांच्यासाठी चॉईस करणं खूपच सोपं असतं ते नेहमीच भारताच्या विजयाची आणि सर्फराजच्या चांगल्या खेळीची दुवा करीत असतात.

https://twitter.com/ANINewsUP/status/1139887917676081158

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)