#PAKvNZ : पाकिस्तानचा न्यूझीलंडवर एक डाव आणि 16 धावांनी विजय

दुबई – मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गोलंदाज यासीर शाहच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडचा एक डाव आणि 16 धावांनी पराभव केला आहे. या विजयाबरोबरच पाकिस्तानने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत  1-1 ने बरोबरी साधली आहे.

पाकिस्तानच्या यासीर शहाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव 90 धावांतच संपुष्टात आला होता. पाकिस्तानने पहिला डाव 5 बाद 418 वर घोषित केला होता. त्यामुळे पाकिस्तानने न्यूझीलंडवर फाॅलोआॅन लादला. त्यामुळे न्यूझीलंडला दुसऱ्या डावाची सुरूवात करावी लागली. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडचा संघाचा पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. न्यूझीलंडचा संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद 312 धावा केल्या.

पाकिस्तानकडून गोलंदाज यासीर शाह याने पहिल्या डावात 8 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट अशा एकूण 14 विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीबदल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)