मॅंचेस्टर – भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढत एखाद्या धर्मयुध्दासारखीच खेळली जाते. अंतिम सामन्यापेक्षाही या लढतीबाबत कमानीची उत्कंठा असते. आज येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामनाही त्यास अपवाद नाही. या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. तरीही ईर्षेने खेळणाऱ्या पाकिस्तानकडून शर्थीची झुंज अपेक्षित आहे.
विश्वचषकातील या हायव्होल्टेज सामन्यास काही वेळातच इंग्लंडच्या मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तान संघाने जिंकला आहे. पाकिस्तान कर्णधार सर्फराझ अहमद याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
Pakistan win the toss and will bowl first at Old Trafford!
FOLLOW ON OUR #CWC19 APP ⬇️
APPLE 👉 https://t.co/whJQyCahHr
ANDROID 👉 https://t.co/Lsp1fBwBKR pic.twitter.com/tShfPkCmel— Cricket World Cup (@cricketworldcup) June 16, 2019