#PAKvNZ T20I series : पाकिस्तानचा न्यूझीलंडवर ‘3-0’ ने मालिका विजय

दुबई : पाकिस्तान संघाने मालिकेतील तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला 47 धावांनी पराभूत केले आणि त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकून न्यूझींलडला व्हाइटवाॅश दिला.

मालिकेतील अखेरच्या आणि तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 166 धावां केल्या. सलमीवीर बाबर आझमने 58 चेंडूत 79 तर मोहम्मद हाफीजने 34 चेंडूत 53 धावा केल्या.

विजयासाठी 167 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 16.5 षटकांत 119 धावांवरच आटोपला. न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसन याने सर्वाधिक 38 चेंडूत 60 धावा केल्या. मात्र तो न्यूझीलंड संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.

पाकिस्तान संघाकडून शादाब खानने 3, वकास मकसूद आणि इमाद वसीमने प्रत्येकी 2 तर फहीम अशरफ याने 1 गडी बाद केला. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याला सामनावीराचा किताब देण्यात आला. तर मोहम्मद हाफीज याला मालिकावीराचा किताब देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)