सार्क परिषदेसाठी पाक मोदींना निमंत्रण पाठवणार 

इस्लामाबाद: पाकिस्तानात होणाऱ्या सार्क संघटनेच्या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे अशी माहिती या देशाच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्‍त्याने आज येथे दिली, सन 2016 साली पाकिस्तानात सार्क परिषद होणार होती पण भारतात उरी येथे भारतीय लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर या परिषदेवर भारताने बहिष्कार घातला होता. त्यानंतर ही परिषदच रद्द करण्यात आली होती.

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते फैजल यांनी सांगितले की पंतप्रधान इम्रान खान यांनी अधिकार पदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भारताबरोबर मैत्री संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यासाठी भारत एक पाऊल पुढे आल्यास आपण दोन पावले पुढे येऊ अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्याच स्पीरीट मध्ये भारताला हे निमंत्रण देण्यात आले आहे.

कर्तारपुर साहिब साठी पाकिस्तानने व्हीसा मुक्त कॉरिडॉर भारतीय शीख यात्रेकरूंना उपलब्ध करून दिला आहे त्यातून दोन्ही देशांतील संबंध सुधारतील अशी आम्हाला आशा आहे. राजनैतिक संबंधात आता नवीन वातावरण निर्माण होत असून लोकांच्या भावना, आशा-आकांक्षा लक्षात घेऊन आता विविध देशांच्या परस्पर संबंधांना महत्व दिले गेले पाहिजे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)