पाकिस्तानवर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देऊ: इम्रान यांची दर्पोक्ती

म्हणे, भारताने पुरावा दिल्यास पुलवामा प्रकरणी कारवाई करू

इस्लामाबाद – पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा भारतीय राजकारणी करत आहेत. मात्र, पाकिस्तानवर हल्ला झाल्यास आम्ही फक्त विचार करत बसणार नाही. प्रत्युत्तर देऊ, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. पुलवामा प्रकरणी भारताने पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करू, अशी ढोंगी भूमिकाही त्यांनी बोलून दाखवली.
पुलवामात मागील गुरूवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. तरीही भारताने पुरावे द्यावेत, अशी नापाक मागणी पाकिस्तानकडून केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुलवामा हल्ल्यानंतरही पाकिस्तानचा खोटारडेपणा कायम असून त्या देशाने उलट्या बोंबा मारणे सुरूच ठेवले आहे. स्वत:च्या देशासाठी इम्रान यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात त्याचेच प्रतिबिंब उमटले. पुरावे दिल्यास कारवाई करण्याची मी हमी देतो. कुठल्या दबावाखाली असल्याने नव्हे; तर पाकिस्तानचे शत्रू असल्याने आम्ही ती कारवाई करू. मात्र, आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. युद्ध सुरू करणे आपल्या हातात आहे. पण, ते संपवणे आपल्या हातात नाही. युद्ध सुरू झाल्यावर काय होईल ते कुणीच सांगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला.

भारतात निवडणूक वर्ष असल्याने पाकिस्तानला दोष देऊन मते मिळवणे सोपे जाईल, असा दृष्टीकोन बाळगला जाण्याबाबत मी समजू शकतो. मात्र, सुज्ञपणा दाखवून भारत चर्चेचा पर्याय खुला ठेवेल अशी आशा मी बाळगतो. अफगाण मुद्याप्रमाणेच काश्‍मीर मुद्‌द्‌यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी आहे.

नव्या पाकिस्तानकडून नवा दृष्टीकोन बाळगला जात आहे. इतरत्र दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करणारे आमचे शत्रू आहेत. मागील पंधरा वर्षांपासून आम्ही दहशतवादाविरोधात लढत आहोत. त्यामुळे दहशतवादी घटनांपासून आम्हाला फायदा कसा होणार, असा सवाल करत इम्रान यांनी पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे नाकारण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)