#CWC19 : पाकिस्तानकडून 1992 ची पुनरावृत्ती होणार?

पुणे – भारताकडून झालेला पराभवानंतर प्रतिष्ठा व बाद फेरीचे आव्हान राखण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत पाकिस्तानने या स्पर्धेत जोरदार कमबॅक केले आहे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांना पराभूत करणाऱ्या पाकिस्तानचे पुढचे “लक्ष्य” अफगाणिस्तानवर मात करण्याचे असणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानने 1992 मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्‍वचषकावर नाव कोरले होते. त्यावेळी लागोपाठ दोन सामने गमाविल्यानंतर त्यांनी लागोपाठ विजयाचा धडाका लावत अजिंक्‍यपदच खेचून आणले होते. यंदाही त्यांची त्यासारखीच वाटचाल सुरू आहे.

1992

वेस्ट इंडिजकडून 10 विकेट्‌सने पराभूत
झिम्बाब्वेवर 53 धावांनी विजय
इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द
भारताकडून 43 धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय
श्रीलंकेवर 4 विकेट्‌सने विजय
न्यूझीलंडवर 7 विकेट्‌सने विजय
उपांत्य फेरीत 4 विकेट्‌सने विजय
अंतिम फेरीत इंग्लंडवर 22 धावांनी विजय

2019

वेस्ट इंडिजकडून 7 विकेट्‌सने पराभूत
इंग्लंडवर 14 धावांनी विजय
श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द
ऑस्ट्रेलियाकडून 43 धावांनी पराभव
भारताकडून 89 धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 49 धावांनी विजय
न्यूझीलंडवर 4 विकेट्‌सने विजय
अफगाणिस्तानविरुद्ध – 29 जून –??
बांगलादेशविरुद्ध दि.5 जुलै–??
उपांत्य फेरी- 9 व 11 जुलै

 

Leave A Reply

Your email address will not be published.