#PAKvNZ Test : दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तान 3 बाद 139

अबूधाबी -पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना अबूधाबी येथे सुरू आहे. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात पाकिस्तान संघाच्या 3 बाद 139 धावा झालेल्या आहेत. पाकिस्तानचा संघ अजूनही 135 धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवरअजहर अली 62 आणि असद शफीफ 26 धावांवर खेळत होते. पाकिस्तानचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. सलामीवीर इमाम उल हक हा 9 तर मोहम्मद हाफीज हा शून्यावर बाद झाला. तर हारिस सोहैल हा  34 धावा काढून बाद झाला.

-Ads-

दरम्यान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने सर्वबाद 274 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून केन विलियमसन याने सर्वाधिक 89 आणि ब्राडली वाटलिंग याने नाबाद 77 धावाची खेळी केली.

पाकिस्तान संघाकडून गोलंदाजीत बिलाल अासिफने 5, यासिर शाहने 3 आणि हसन अली व शाहीन अफरीदीने प्रत्येकी 1 गडी बाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)