पाकिस्तानकडून युद्धबंदीचा भंग; जम्मूच्या अखनूर आणि नौशेरा क्षेत्रात गोळीबार

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर सीमेवरील पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला आहे आणि जोरदार गोळीबार केला जात आहे. जम्मूच्या अखनूर आणि नौशेरा क्षेत्रातील प्रचंड गोळीबाराची बातमी आहे. पुंछ क्षेत्रात देखील पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे. भारतीय सैनिक पाकिस्तानच्या फायरिंगला उत्तर देत आहेत.

जम्मू-काश्मीर: पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील नौहेरा सेक्टरमध्ये युद्धबंदीचा भंग केला

भारतीय वायुसेनेच्या कारवाईत सुमारे ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. ज्यात मसुद अझहरचा मेहुणा जसफ अझहर याला ठार मारण्यात आले. या महान ऑपरेशनसाठी भारतीय वायुसेनेला १२ मिराज लढाऊ विमानांचा वापर केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तसेच बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक आयोजित केली. या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र सेना, नागरिकांना “सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी सज्ज” राहण्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)