ब्रिस्टॉल : वर्ल्डकप स्पर्धेत ब्रिस्टॉल येथे होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असा सामना आज होणार होता, परंतु पावसाच्या दमदार खेळीनं सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर पंचांनी हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले.
पावसामुळे सामना सुरुच होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना आयसीसीने प्रत्येकी 1 गुण दिला आहे. मात्र सामना न झाल्याने दोन्ही देशाच्या क्रिकेट चाहत्यांची आणि मैदानातील प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली.
Disappointing news from Bristol. #PAKvSL has been abandoned – both sides have been awarded a point. #WeHaveWeWill #LionsRoar #CWC19 pic.twitter.com/VyZlS6RVGx
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 7, 2019
दरम्यान, याआधी वेस्ट इंडिजकडून लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळविला होता. तर दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यांनी दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानला हरविले होते.