18 परदेशी एनजीओ’नी 2 महिन्यात देश सोडावा : पाकिस्तान सरकार 

इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तान सरकारने 18 परदेशी एनजीओना आपले कामकाज बंद करून दोन महिन्यांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने या 18 परदेशी एनजीओना आपले पाकिस्तानमधील कामकाज बंद करण्यास सांगितले असून त्यासाठी 60 दिवसांची मुदत दिलेली आहे. बंद करण्यास सांगण्यात आलेल्या या 18 परदेशी एनजीओमध्ये 9 अमेरिकन, 3 ब्रिटिश आणि 2 नेदर्लॅंड्‌सच्या आहेत.
बाकी चार एनजीओ इटली, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि आयर्लॅंडमधील आहेत. या 18 एनजीओंबरोबरच अन्य 72 एनजीओंवर अपूर्ण दस्तावेजांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र 66 परदेशी एनजीओंसह 141 एनजीओंना आपले काम चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)