भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाकिस्तानात घेणार व्हीसलब्लोअरची मदत

इस्लामाबाद: सरकारी कारभारात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी तो शोधून काढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षिसी देण्याचा नवा कायदा करण्याचा इरादा पंतप्रधान इम्रानखान यांनी व्यक्त केला आहे. व्हीसलब्लोअर स्वरूपाचा हा कायदा असेल असे त्यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी जुलै महिन्यात पाकिस्तानात झालेली निवडणुक भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरूनच जिंकली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नवनवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न पंतप्रधान इम्रान खान करीत आहेत.

नवा व्हीसलब्लोअर कायदा हा त्याचाच एक भाग असेल. सरकारी यंत्रणांमध्ये होणारा भ्रष्टाचार तेथे काम करणारे सरकारी कर्मचारीच प्रभावीपणे उघडकीला आणू शकतात. त्यामुळे त्यांना संरक्षण देत त्यांना प्रोत्साहन भत्ताही लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे.

-Ads-

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेतील बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन खूपच खराब झाली आहे. ती परिस्थिती सुधारायची असेल तर सरकारचा लुटलेला पैसा परत मिळवणे हा एक महत्वाचा भाग आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. गेल्या काही दशकात अब्जावधी डॉलर्सची रक्कम राजकारणी व सत्ताधाऱ्यांनी लुटली आहे.

असा लुटण्यात आलेला सरकारी पैसा जो कोणी उघड करेल त्याला त्यातील 20 टक्के रक्कम देण्याची तरतूद नवीन कायद्यात केली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. उरलेली 80 टक्के रक्कम सरकारवरील कर्ज फेडण्यासाठी वापरली जाणार आहे. पाकिस्तानची सध्याची अर्थव्यवस्था पुर्ण गाळात गेली असून तीला बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मागण्यात आली आहे. पण नाणेनिधीने अजून पाकिस्तानला कोणतेही आश्‍वासन या बाबतीत दिलेले नाही.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)