समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट निकालावरून पाकिस्तानचा तिळपापड

नवी दिल्ली – समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. बारा वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष एनआयए ( NIA ) कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी हरियाणा पोलिसांनी केली आणि त्यानंतर हे प्रकरण एनआयए ( National Investigation Agency) कडे सोपवण्यात आले होते. दरम्यान, आज स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींची सुटका केल्यामुळे पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना निमंत्रित करून निषेध नोंदविला आहे.

https://twitter.com/ANI/status/1108392755879919617

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)