पाकच्या उपउच्चायुक्तांना बजावले समन्स 

नवी दिल्ली – शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या कारवाईचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच पाकच्या या कृतीसाठी भारतातील पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सैय्यद हैदर शाह यांना समन्स बजावले आहे. त्यानंतर शाह यांनी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास साऊथ ब्लॉकमध्ये हजेरी लावली.

पाकिस्तानने आज (बुधवारी) भारताच्या सैन्य तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. उलट भारताने उत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. दरम्यान, पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग विमान कोसळले असून या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. त्यामुळेच पाकिस्तानच्या विमानांचा भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानमधील भारताचे उपउच्चायुक्‍त गौरव अहलूवालिया यांनीही शस्रसंधीचे उल्लंघन केल्याप्रकरणी निषेध नोंदविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)