पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती

अतिरेकी तळ प्रत्यक्ष ताबा रेषेपासून हलविले

श्रीनगर – पुलवामाच्या घटनेनंतर पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे दहशतवादी त्यांची तळ प्रत्यक्ष ताबा रेषेपासून दूर नेऊ लागले आहेत. तसेच पाकिस्तान लष्कराच्या आश्रयाला गेले आहेत. या हल्ल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा सर्जिकल स्टाईक करेल याच्या भीती पोटी पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

पाककडून हिवाळ्यात सीमेवरील चौक्‍या कायम
पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून एखादी कारवाई होऊ शकते, असे पाकिस्तानला असे वाटत आहे.त्यामुळेच पाकने यावर्षी हिवाळ्यात सीमेवरील चौक्‍या कायम ठेवल्या आहेत. सूत्रांच्या मते पाकिस्तान दर वर्षी हिवाळ्यात सीमेवरील 50 टक्के चौक्‍यांवरील जवानांना माघारी बोलवते. पण यावेळी तसे करण्यात आले नाही. या सर्व चौक्‍यावर दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड ठेवण्यात आल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांकडून वापरले जाणारे हे लॉन्चपॅड पाक लष्कराच्या कॅंम्पमध्ये ठेवले जाणार आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाई करण्याचे संपूर्ण स्वातंत्रय लष्कराला दिले आहेत. त्याच बरोबर पंतप्रधान मोदींनी काल महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराने हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव आहे. काश्‍मीरमधील ग्‌ुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेवर आर्टिलरी तैनात करण्याच्या हलचाली दिसत नाहीत.

प्रत्यक्ष ताबा रेषेच्या जवळ हवाई हल्ले करण्याचा पर्याय भारताला वापरता येणार नाही. कारण येथील दहशतवादी कॅम्प हटवण्यात आले आहेत. अशाच कॅम्प दहशतवादी तयार केले जातात आणि त्यांना भारतात पाठवले जाते. त्यामुळे भारताकडे एकच पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे पाकिस्तान लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा. पण त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)