महागाई वाढल्यामुळे पाकिस्तान अडचणीत

कराची-आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्य़ा पाकिस्तानची स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. देशात अन्नधान्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानचा महागाई दर मागील 5 वर्षांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.

मार्च महिन्यात महागाईचा दर 9.4 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे. महागाईत वाढ, आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बॅंकेने व्याजदर वाढवत 10.75 टक्‍क्‍यांवर नेला आहे. पाकिस्तानवर एफएटीएफच्या कारवाईची टांगती तलवार आहे. एफएटीएफने पाकिस्तानचा काळय़ा यादीत समावेश केल्यास तेथे भूकबळीची स्थिती उद्भवू शकते.

सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला अब्जावधी रुपयांची मदत करण्यात आली असली तरीही स्थितीत काही फरक पडल्याचे दिसून येत नाही. पाकिस्तानात मार्चच्या तुलनेत कांद्याच्या किमतीत तेथे सुमारे 40 टक्‍के, टोमॅटो 19 टक्‍के, मांस 16 टक्‍के, मुगडाळ 13 टक्‍के, फळांमध्ये 12 टक्‍के, गूळ 3 टक्‍के, साखर 3 टक्‍के, मासे-मसाले आणि अन्य डाळी, तूप, तांदूळ, बेकरी उत्पादन, खाद्यतेल तसेच गव्हाच्या किमतीत 1.25 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्‍सनुसार मार्च 2019 महागाईदर वाढून 9.4 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत चाललेल्या किमती पाकिस्तानातील महागाई वाढण्यामागे कारणीभूत असल्याचा दावा पीबीएसने केला आहे. मागील 3 महिन्यात भाज्या, फळे आणि मांसाच्या किमती शहरांमध्ये सातत्याने वाढत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)