पाकिस्तानने लाहौर-दिल्ली मार्गावर धावणारी समझोता एक्स्प्रेस थांबवली

इस्लामाबाद: भारताने वायूसेनेच्या  १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्या. या हल्ल्यात जवळपास ३५० दहशतवादीही ठार झाले आहेत. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने पाकिस्तानने लाहौर-दिल्ली मार्गावर धावणारी समझोता एक्स्प्रेस थांबवली.

तसेच जम्मू-काश्मीर सीमेवरील पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला आहे आणि जोरदार गोळीबार केला. भारतीय सैनिक पाकिस्तानच्या फायरिंगला उत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी हवाई दलाच्या तीन विमानांनी आज नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी या विमानांना पिटाळून लावले. तसेच, पाकचं एफ-१६ हे विमान पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)