पाकिस्तानच्या यासिर शहाला विक्रमाची संधी

अबुधाबी – पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शहाला सर्वांत कमी कसोटी क्रिकेट सामन्यांत 200 बळी पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हा यासिरचा 33 वा कसोटी सामना असून पहिल्या डावात यासिरने न्यूझीलंडचे तीन गडी बाद केले आहेत. त्यामुळे सध्या यासिरच्या नावावर 33 कसोटी सामन्यात 198 बळी जमा आहेत.

पाकिस्तानचा संघ सध्या पहिल्या डावात फलंदाजी करत असून त्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडचे दोन गडी बाद केल्यास यासिरच्या नावे सर्वांत कमी कसोटी सामन्यांत 200 बळी पूर्ण करण्याचा विक्रम होईल.

-Ads-

यापूर्वी सर्वांत कमी कसोटी सामन्यात 200 बळीचा विक्रम हा सध्या आॅस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज क्लॅरी ग्रिमेट यांच्या नावे आहे. ग्रिमेट यांनी 1936 मध्ये 36 कसोटींत 200 बळी पूर्ण केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)