दहशतवाद्यांवरील कारवाई प्रकरणी कानउघाडणी
वॉशिंग्टन – पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या दौऱ्यापुर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा तंबी दिली असून पाकिस्तानने जर दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईमध्ये सातत्य आणि सुसुत्रता नाही आणली तर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारे अर्थसहाय्य मिळण्यापासून रोखले जाईल.
2018 साली डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करत दहशतवाद रोखण्यासाठी दिले जाणेरे अर्थसहाय्य रोखले होते. त्यानंतर सातत्याने अमेरिका पाकिस्तानवर टिका करताना पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टिका करत होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आगामी महिण्यात अमेरिकेच्या दौर्यावर येणार असून पाकिस्तानला आशा होती की त्यांचा दौरा या दोन्ही देशांअम्धील बिघडलेले संबंध सुधारण्याच्या कामी येऊ शकेल. मात्र, त्यांच्या दौऱ्यापुर्वीच अमेरिकेच्या संसदेत पाकिस्तानने दहशतवाद्यांवर अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचे उघड करत पाकिस्तानला दिली जाणारी मदत देऊ नये असे पुन्हा सुचवले आहे.
यावेली अमेरिकन कायदेमंडळातील संशोधन सेवा देणाऱ्या सीआरएसच्या रिपोर्ट नुसार अमेरिकेकडून दहशतवादाशी लढा देण्याचे कारण समोर करून पाकिस्तान नेहमीच मदत स्विकारत आला आहे. मात्र, त्यांनी दहशतवादाचा बिमोड करण्या ऐवजी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी या पैशाचा वापर केल्याचे अनेक वेळा दिसून आल्याचे सांगताना ओसामा बिन लादेनचे उदाहरण दिले आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानवर विश्वास न ठेवता ते जोपर्यंत दहशतवाद्यांवर ठोस कारवाई करत नाहीत तो पर्यंत त्यांना पैशाची मदत करु नये असा सल्ला देखील दिला आहे.