पाकिस्तानकडून हवाई हद्द पुन्हा खुली 

कराची – पाकिस्तानने आज आपली हवाई हद्द पुन्हा पूर्णपणे खुली केली. केवळ बॅंकॉक, नवी दिल्ली आणि कुआलांपूरला जाणाऱ्या विमानांव्यतिरिक्‍त अन्य सर्व विमानांसाठी ही हवाई हद्द खुली करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी पुलवामान हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या “एअर स्ट्राईक’च्या पार्श्‍वभुमीवर 27 फेब्रुवारीपासून पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती.

दोन्ही देशांमधील तणावाच्या प्राथमिक काळानंतर इस्लामाबाद, कराची आणि पेशावर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी हवाई हद्द खुली करण्यात आली. पण पंजाब प्रांतातील पूर्वेकडील हवाई हद्द सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आली होती. लाहोरच्या अल्लामा इक्‍बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फारच मर्यादित प्रमाणात या हवाई हद्दीचा वापर केला जात होता. नवी दिल्ली, बॅंकॉक आणि कुआलालांपूरची विमानसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहणार आहे, असे पाकिस्तान हवाई वाहतुक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)