पाकिस्तान भारताशी युध्दाच्या तयारीत : नियंत्रण रेषेवर वाढवले सैन्य

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्याने वाढता दबाव आणि भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने युद्धाची पूर्वतयारी करण्यात सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुवारी नॅशनल सिक्युरिटी कमिटीसोबत बैठक घेत भारताकडून होणाऱ्या हल्ल्याला तयार राहण्यास सांगितले आहे.

एवढेच नव्हे तर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. यासाठी विशेष नोटीसही जारी करण्यात आली आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत मिळावी यासाठी योजना आखण्यात आली असून यामध्ये राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून सिव्हिल रुग्णालयांमध्ये जवानांसाठी २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैश ए मोहम्मद विरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याची घोषणा केली होती. तसेच लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)