पाकिस्तानी कैदी हत्या प्रकरण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे राजस्थान सरकारला ‘नोटिस’

जयपूर : जयपूर येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानी कैद्याचा अन्य कैद्यांकडून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना काल उघडकीस आली होती. या घटनेची दाखल घेत आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राजस्थान सरकारला या घटनेबाबत नोटीस बजावले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शकरूल्लाह नामक ५० वर्षीय पाकिस्तानी नागरिक जयपूर येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये  २०११ पासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. काल कारागृहामध्ये कायद्यांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये शकरूल्लाहच्या डोक्यात अन्य कैद्यांनी मोठ्या आकाराचा दगड घालत त्याचा निर्घृण खून केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी कैद्याच्या हत्येमागे भारत-पाकिस्तान यांच्यातील पुलवामा हल्ल्यानंतर वाढलेला तणाव असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला असून याच पार्श्ववभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशभरातील सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या क्षेत्रामधील कारागृहांमध्ये असणाऱ्या पाकिस्तानी कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारीचे उपाय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1098562248350597121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)