पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत सतर्कता

राष्ट्रपती भवन मध्ये घेणार पंतप्रधानपदाची शपथ

इस्लामाबाद – पाकिस्तान मध्ये इम्रान खान यांच्या सुरक्षितेबाबत विशेष सतर्कता घेतली जात आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंन्साफ(पीटीआई) पार्टीचे प्रमुख इम्रान खान हे डी-चौक किंवा परेड ग्राउंडच्या मोकळ्या जागेएेवजी राष्ट्रपती भवनामध्ये शपथ घेणार आहेत. खान यांचा पक्ष 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

-Ads-

65 वर्षीय इम्रान खान 11 आॅगस्ट रोजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, खान यांनी वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेतली. ज्यामध्ये सरकारची बांधणी आणि कुठे शपथविधी होणार आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर कुठे राहणार, या विषयावर चर्चा झाली.

चर्चेमध्ये एका नेत्याने सांगितले की इम्रान खान हे राष्ट्रपती भवन मध्ये शपथ घेणार आहेत, कारण ते एक सुरक्षित ठिकाण आहे. राष्ट्रपती ममून हुसैन त्यांना प्रधानमंत्री पदाची शपथ देणार आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाकडून अजूनपर्यत याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही की खान यांच्या शपथग्रहण सोहळ्याला कोणाला आमंत्रण देण्यात आले आहे, मात्र स्थानिक मीडिया नुसार, भारतीय माजी क्रिकेट खेळाडू कपिल देव, सुनिल गावस्कर, नवजोत सिंह सिध्दू आणि बाॅलिवूड अभिनेता अामिर खान यांना आमंत्रित केले जाऊ शकते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)