बानी गला अतिक्रमणाबाबत इम्रान खानविरोधात कारवाईचे आदेश

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बानी गला कोठी अतिक्रमण संबंधात सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश साकिब निस्सार यांनी बानी गला कोठीविरोधात अतिक्रमणाच्या तक्रारी आल्याचे सांगितले आहे.
आपले अशील इम्रान खान हे या बाबतीत सीडीए (कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) ला सहकार्य करतील असे इम्रान खान यांचे वकील बाबर अवान यांनी सांगितले आहे. बानी गला अतिक्रमण प्रकरणी इम्रान खान यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बानी गला अतिक्रमणाबाबत स्वत: इम्रान खान यांनी सर्वोच्च न्यायालयात निवेदन दिलेले आहे.
सीडीए ने या विरोधात कडक कारवाई करावी असे न्यायमूर्ती बाबर यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी दंड भरून आपली कोठी नियमित करून घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाने अगोदर इम्रान खान यांना सांगितले होते.
भ्रष्टाचाराबाबत इम्रान खान सरकारने सर्वात पहिली कारवाई विरोधे पक्षांच्या नेत्यांवर केली होती.
इम्रान खान यांनी आपली मालमत्ता सर्वप्रथन नियमित करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला पाहिजे होता असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)