#CWC19 : पाकिस्तानचे खेळाडू आज मायदेशी परतणार

कराची : विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू रविवारी मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या प्रवक्‍त्याने ही माहिती दिली.

संघातील काही खेळाडूंना येथे पत्रकारपरिषदेस सामोरे जावे लागणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर, तसेच वहाब रियाझ, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक हे मात्र इंग्लंडमध्येच काही दिवस राहणार आहेत. संघाचे अन्य दोन प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर व अजहर मेहमूद हेदेखील संघाबरोबर नसतील असे प्रवक्‍त्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरी गाठणे हे पाकिस्तानसाठी स्वप्नरंजनच झाले होते. कालच्या अखेरच्या लढतीत पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळविला. त्यानंतर न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे गुण समान होते, पण पाकचा रनरेट कमी असल्यामुळे त्यांना उपांत्यफेरी गाठता आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)