पाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर 

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या जनतेला लवकरच पाप कर भरायला लागणार आहे. त्यांना सिगारेट आणि सरबतवर  ‘Sin Tax’  द्यावा लागणार आहे, याबाबतची माहिती पाकिस्तानचे आरोग्य मंत्री अमीर महमूद कियानी यांनी दिली आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ सरकार देशातील सर्व घरगुती उत्पादनाच्या  वस्तूंवर  पाच टक्के कर हा आरोग्य बजेटसाठी वापरण्यासाठी प्रयत्न करत आहे. या कामासाठी त्यांना नफा वाढवावा लागणार आहे. यासाठी सरकार अनेक उपाय आमलात आणत आहे. त्यामधील एक उपाय म्हणून तंबाखू आणि अन्य पेयांवर पाप कर (Sin Tax) लावण्यात येणार आहे. यामधून जो फायदा होईल तो आरोग्य बजेटसाठी वापरण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री कियानी यांनी दिली आहे.

काय असतो सिन टॅक्स ? 

सिन टॅक्स म्हणजे पाप कर. हा दारू, सिगारेट,पोर्नग्राफी आणि जुगारावर लावला जाणारा डायरेक्ट टॅक्स आहे. हा टॅक्स या वस्तू बनवण्यावर अथवा होलसेलर विक्रीवर लावला जातो. या टॅक्समधून मिळणारी रक्कम ही सामाजिक आणि आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. अमेरिकेमध्ये देखील सिन टॅक्स इंफ्रास्ट्रक्चरसाठी वापरण्यात येतो. तसेच स्विडनमध्ये या करामधून मिळणारी रक्कम जूगाराच्या सवयीपासून ग्रस्त असलेल्या लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येते.

सध्या पाकिस्तान सरकार हे आरोग्यावर संपूर्ण जीडीपीच्या केवळ 0.6 टक्के खर्च करते. माध्यामाच्या एका अहवालानुसार महासंचालक डाॅ.असद हफीज यांच्या माहितीनुसार जगातील जवळपास 45 देशांमध्ये हा कर लावण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)