हाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : पाकिस्तान हाॅकी संघाला दोन धक्के

भुवनेश्वर – भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरूष हाॅकी विश्वचषकमध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तान संघास गुरूवारी एका मागोमाग असे दोन धक्के बसले आहेत. त्यामुळे पुढील सामन्यापूर्वी  पाकिस्तान संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

पहिला धक्का म्हणजे पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान हा दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर दुसरीकडे उपकर्णधार अहम्मद बट याच्यावरही एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

साखळी फेरीतील मलेशियाविरूध्दच्या लढतीत अहम्मद बटने सामन्यादरम्यान मैदानात हुज्जत घातल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 9 डिसेंबर (रविवारी) होणाऱ्या नेदरलँड्सविरूध्दच्या सामन्यात त्याला खेळता येणार नाही.  पाकिस्तान संघाचे व्यपस्थापक हसन सरदार यांनी आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी पक्षापातीपणा झाल्याचे म्हटले आहे.

स्पर्धेत पाकिस्तान संघाने एक सामना जिंकला आहे तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना 9 डिसेंबर रोजी नेदरलॅड्सविरूध्द होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)