पाकिस्तान म्हणजे “भाड्याने घेतलेल्या बंदुका नव्हे’ : इम्रान खान यांचे अमीरिकेला उत्तर

इस्लामाबाद: पाकिस्तानला दुसऱ्या कोणाविरोधातील युद्धासाठी भाड्याने घेतलेल्या बंदुकांप्रमाणे वागवले जाऊ देणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दहशतवादी गटांविरोधात पाकिस्तानकडून आणखी कारवाईची अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने आशिया धोरण जाहीर केले होते. अमेरिकेने ज्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये ठार मारले, त्यांना पाकिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय दिला जात असल्याचा आरोप या आशियाविषयक धोरणामध्ये करण्यात आला होता. यावर्षी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला द्यायची 300 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत रद्द केली. तेंव्हाही पाकिस्तानकडून दहशतवादी गटांवर कठोर कारवाई न झाल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

“दुसऱ्या कोणाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला भाड्याच्या बंदुकांप्रमाणे वागणाऱ्यांबरोबर आपण कोणतेही संबंध ठेवणार नाही.’ असे इम्रान खान म्हणाले. 1980 साली अफगाणिस्तानमध्ये घुसलेल्या सोव्हिएत सैन्याविरोधात आणि आता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कारवाई संदर्भात ते बोलत होते.

या कारवाईमुळे पाकिस्तानची जिवीत हानीही होते आहे आणि पाकमधील आदिवासी- वनक्षेत्राचे अपरिमित नुकसानही होत आहे. याशिवाय पाकच्या प्रतिष्ठेलाही बाधा पोहोचते आहे, असे इम्रान खान म्हणाले. अमेरिकेचे पाकिस्तानबरोबरचे संबंध जसे काही गोष्टींवर अवलंबून आहेत, तसे चीनबरोबरचे संबंध अवलंबून नाहीत. चीनबरोबर व्यापारी संबंध आहेत. तसेच संबंध अमेरिकेबरोबरही असावेत, अशी अपेक्षाही खान यांनी व्यक्‍त केली. मात्र अमेरिकेचे धोरण पटत नाही, याचा अर्थ आपली भूमिका अमेरिकाविरोधी नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)