इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यास जाणार- नवजोत सिंग सिध्दू

कपिल, गावस्कर म्हणाले अजून कोणतेही आमंत्रणच मिळाले नाही

नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी  क्रिकेटर आणि राजकीय नेता इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ हा पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. त्यामुळे पक्षाची सरकार बनविण्याची जोरदार तयारी चालू आहे. क्रिकेटरचा नेता झालेल्या इम्रान खानने पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदाची शपथ घेताना होणाऱ्या सोहळ्यासाठी खास शेरवाणी शिवून घेतली आहे. इम्रान खान हे 11 आॅगस्ट रोजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधी या खास शपथग्रहण सोहळ्यासाठी इम्रान खान हे भारतातील कोणाला आमंत्रण देणार आहेत आणि त्यापैकी कोण-कोण हे आमंत्रण स्विकारून शपथग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे. आतापर्यत एक-दोन जणांचे नाव स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी भारतीय माजी क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर, कपिल देव, नवजोत सिंग सिध्दू आणि अभिनेता आमिर खान यांना आमंत्रण दिले आहे. त्यापैकी पंजाब राज्यातील कॅबिनेट मंत्री नवजोत सिंग सिध्दू यांनी इम्रान खान यांच्या प्रधानमंत्री शपथ ग्रहण सोहळ्याचे आमंत्रण स्विकारले आहे. बुधवारी दिलेल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, हा एक सन्मान आहे आणि मी हे आमंत्रण स्विकारत आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की इम्रान खान यांच्यावर विश्वास ठेवावा. खेळाडू हे संपर्क वाढवतात, येणाऱ्या अडचणी दूर करतात आणि लोकांना जोडण्याचे काम करत असतात.

दरम्यान, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी स्पष्ट केले आहे की, इम्रान खान यांच्याकडून अजूनपर्यत तरी कोणतेही आमंत्रण आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)