दंडाची रक्‍कम हप्त्यांमध्ये भरु द्या – पाकिस्तान हॉकी

लाहोर – पाकिस्तान हॉकी फेडरेशन आर्थिक संकटात सापडलेली असल्याने हॉकी प्रो-लिग स्पर्धेत पाकिस्तानने ऐनवेळी माघार घेण्याचे ठरवल्या नंतर. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने पाकिस्तान हॉकी फेडरेशनला 1 लाख 70 हजार युरोजचा दंड ठोठावला. मात्र आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तान हॉकी फेडरेशनने इतका मोठा दंड भरणं आम्हाला शक्‍य नसल्याचं कळवले असून पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे सचिव शाहबाज अहमद यांनी, हा दंड हप्त्‌यांमध्ये भरण्याची मूभा आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मागितली आहे.

यावेळी बोलताना शाहबाज अहमद म्हणाले की, पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडे सध्या संघ सामन्यांना पाठवण्या इतकेही पैसे शिल्लक नाहीत. अशी परिस्थिती असताना आम्ही दंड कुठून भरणार? सध्या पाकिस्तान हॉकीमध्ये प्रचंड आर्थिक तणाव सुरु आहे, ही परिस्थिती मी आंतरराष्ट्रीय संघटनेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या घडीला संघटनेला दंड ठोठावण्यापेक्षा आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. असेही शाहबाजयांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर आंतरराष्ट्रीय संघटनेने अद्याप बंदीची कारवाई केली नसल्यामुळे, पाकिस्तान संघटनेचे पदाधिकारी निधी जमावण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र 20 जूनपर्यंत दंड न भरल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल असा इशारा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तान हॉकी फेडरेशन या प्रश्नावर कसा तोडगा काढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)