#SAvPAK 4th ODI – नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

जोहान्सबर्ग – दक्षिणआफ्रिका विरूध्द पाकिस्तान यांच्यातील पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यास थोड्याच वेळात जोहान्सबर्ग येथील न्यू वॉन्डरर्स स्टेडियमच्या मैदानावर सुरूवात होणार आहे. दरम्यान पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

पाच सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल, तर पाकिस्तानला मालिका पराभवापासून वाचण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद खेळणार नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात शोएब मलिककडे कर्णधारपद सोपिवले आहे.

दक्षिण आफ्रिका संघ – क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, रीज़ा हेंड्रिक्स, फाफ डू प्लेसी, रैसी वैन डर डुसेन, डेविड मिलर, एन्डिले फेहलुकवेओ, कगिसो रबाडा, डेल स्टेन, ब्यूरान हेंडरिक्स, इमरान ताहिर

पाकिस्तान संघ – इमाम-उल-हक, फ़ख़र ज़मान, बाबर आज़म, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद रिजवान, इमाद वसीम, शादाब ख़ान, मोहम्मद आमिर, उस्मान खान, शाहीन अफरीदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)