जैशबाबत पाकिस्तानला हवे आणखी पुरावे 

इस्लामाबाद –  पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात असल्याचे पाकिस्तानला आणखी पुरावे हवे आहेत. तसेच “जैश’चे तळ पाकिस्तानच्या हद्दीतच असल्याचेही पुरावे पाकिस्तानने भारताकडे मागितले आहेत.

इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्‍तांना आज पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी परराष्ट्र मंत्रालयामध्ये बोलावून घेतले आणि पुलवामा हल्ल्याच्या प्राथमिक तपासाची माहिती दिली. भारताने पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला दिलेल्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर ही प्राथमिक तपासणी करण्यात आली.

भारताने ही कागदपत्रे 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या प्रभारी उच्चायुक्‍तांकडे सोपवली होती. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए- मोहम्मदचा हात असल्याची ठोस माहिती या कागदपत्रांमध्ये होती. तसेच जैशचे तळ आणि म्होरकेही पाकिस्तानात असल्याची माहितीही त्यामध्ये होती. अधिक तपासासाठी अधिक पुरावे आवश्‍यक असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)