पाकिस्तानने जिनिव्हा कराराचा भंग केल्याचे उघड

नवी दिल्ली – पाकिस्तानने जिनिव्हा कराराचा भंग केल्याचे उघड झाले आहे. भारतीय हवाई दलाचा एक पायलट आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आणि त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत बांधलेल्या स्थितीतील एक व्हिडियो सोशल मीडियावर टाकला. आपल्या या कृतीने पाकिस्तानने जिनिव्हा कराराचा भंग केला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिनिव्हा करारानुसार युद्धकैदी आणि युद्धात पकडले गेलेले नागरिक यांना मानवतावादी दृष्टिकोनातून वर्तणूक दिली पाहिजे.

पाकिस्तान सरकारने भारतीय हवाई दलाच्या पायलटचा व्हिडियो सोशल मीडियावर टाकल्यानंतर ट्विटरवरही जिनिव्हा करार (“Geneva Convention”) आणि से नो टू वॉर (“#SayNoToWar) हे टॉप ट्रेंड झाले आहेत. भारत व पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यसाठीही त्यावर मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. भारतातील लष्करी ठिकाणावर हल्ला करणारे पाकिस्तानचे जेट विमान पाडण्याच्या कारवाईत आपला एक पायलट बेपत्ता असल्याचे भारत सरकारने जाहीर केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या महायुद्धानंतर 194 देशांनी 1949च्या जिनिव्हा कराराला मान्यता दिलेली आहे. लष्करी आणि नागरी युद्धकैद्यांना देण्याच्या वागणुकीबाबत त्यात जखमीं व आजारींच्या उपचारांसह सुरक्षिततेसाठी उपाययोजनांचा उल्लेख आहे.
पाकिस्तान सरकारने नंतर आपल्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवरून तो व्हिडियो काढून टाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)