#AirStrike – पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतावर एलओसी उल्लंघनाचा केला आरोप

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास 300 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. यामध्ये अझर मसूदचा मोठा भाऊ अझहर खान देखील ठार झाला आहे.

या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच  परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशीने म्हटले आहे की, ‘हा भारताचा पाकिस्तानवर आक्रमक हल्ला आहे. हे एलओसीचे उल्लंघन आहे आणि पाकिस्तानला स्वतचे रक्षण करण्याचा आणि पलटवार करण्याचा पूर्ण अधिकार आहे’.

https://twitter.com/ANI/status/1100293358218563584

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)