पीसीबीला आयसीसीचा दणका

बीसीसीआय विरुद्धची याचिका फेटाळली

दुबई – भारताने पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका खेळवण्यास नकार देत त्यांच्या विरोधात 2008 नंतर कोणतीही मालिका खेळवली नव्हती त्यामुळे आमचे नुकसान झाले असून बीसीसीआयकडून आम्हाला आमच्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाई म्हणुन 447 करोड रुपये देण्यात यावे अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने त्यांची ही मागणी फेटाळली आहे.

सदर प्रकरणी आयसीसीने एक समिती गठित केली होती. या समितीला भारताची बाजू पटली असून त्यांनी पाकिस्तानला या मुद्यावरुन फटकारले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी करार झाला होता. मात्र, 2008 साली भारतात आतंकवादी हल्ला झाला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. त्यामुळे 2008 साली झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतरही पाकिस्तानने भारताला मालिकेबाबत विचारणा केली होती. त्यावेळी बीसीसीआयने त्यांना सांगितले होते की, जोपर्यंत केंद्र सरकार आम्हाला परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर द्विपक्षीय मालिका खेळू शकत नाही.
बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांच्याकडे 447 कोटीरुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. बीसीसीआयने ही मागणी फेटाळून लावली होती.

त्यानंतर पाकिस्तानने आम्ही आयसीसीकडे दाद मागायला जाण्याचा तयारीत आहोत, अशी धमकी वजा माहिती बीसीसीआयला दिली होती. बीसीसीआयने यावेळी कोणतीही प्रतिक्रीया न दिल्याने पीसीबी आयसीसीकडे दाद मागितली होती. यानंतर आयसीसीने याप्रकरणी एक समिती गठन केली होती. या समितीने पीसीबी आणि बीसीसीआयचे म्हणणे ऐकून घेतले.

याप्रकरणी 1 ते 3 ऑक्‍टोबर दरम्यान तीन दिवस सुनावणी करण्यात आली आणि भारत पाकिस्तानला नुकसान भरपाई देणार नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे पीसीबी पुन्हा एकदा तोंडावर आपटली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)