भारतीय युवकांना उद्धवस्त करण्याचा पाकिस्तानचा प्लॅन 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली: पंजाबमध्ये गंभीर बनलेल्या अंमली पदार्थांच्या समस्येसाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले. भारतीय युवकांना उद्धवस्त करण्याच्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन प्लॅनचा तो भाग असल्याचा दावा त्यांनी केला.
अमरिंदर शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. मागील काही वर्षांत पंजाबमध्ये अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. त्यामागे शेजारी देश (पाकिस्तान) आहे. सीमेलगतचे युवक तंदुरूस्त राहिले नाहीत; तर त्यांच्या लष्करातील भरतीवर परिणाम होईल असा नापाक उद्देश अंमली पदार्थांच्या तस्करीमागे आहे, असे त्यांनी म्हटले. अलिकडेच गुजरात आणि काश्‍मीरमध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाचे मोठे साठे जप्त करण्यात आले. ते साठे पंजाबला पाठवले जाणार होते, याकडे अमरिंदर यांनी लक्ष वेधले. अंमली पदार्थांच्या तस्करीला आणि विक्रीला आळा घालण्यासाठी पंजाब सरकार पाऊले उचलत आहे. अंमली पदार्थांची विक्री करणारे बडे विक्रेते यंत्रणांच्या रडारवर आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)