#PAKvNZ Odi series : पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय

अबूधाबी –  पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर 6 गडी राखून विजय संपादन केला आहे. या विजयासह पाकिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 9 बाद 209 धावा करत पाकिस्तान संघासमोर 210 धावांच आव्हान ठेवले होते. विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघाने अवघ्या 40.3 षटकांत पूर्ण केले. पाकिस्तान संघाकडून फखर जमान याने 88 चेंडूत 11 चौकारासह सर्वाधिक 88 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तान गोलंदाजीमध्ये शाहीन अाफ्रिदीने 4, हसन अलीने 2, मोहम्मद हाफीज आणि शादाब खानने प्रत्येकी  1 गडी बाद केला. न्यूझीलंड फलंदाजापैकी राॅस टेलर याने सर्वाधिक 86 धावा केल्या. शाहीन आफ्रिदी याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)