पाकिस्तान मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान बॉम्बस्फोट !

पेशावर: उत्तर पश्चिम पाकिस्तान मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान बॉम्बस्फोट झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान मध्ये २५ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत.

पाकिस्तान मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान झालेला हा तिसरा बॉम्बस्फोट आहे. यामध्ये जमियत उलेमा ए इस्लाम-फजलचे नेता अकरम दुर्रानी सुद्धा जखमी झाले आहेत. विस्फोटक एका दुचाकीवर ठेवण्यात आले होते. प्रचाराची रॅली जवळ येताच स्फोट झाला. ज्या ठिकाणी सभा होती त्याच्या ४० मीटर दूर बॉम्बस्फोट झाला असल्याचे वृत्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)