अमेरिकेचा निर्णय पाकिस्तानने धुडकावला

म्हणे पाकिस्तानात अल्पसंख्यकांशी भेदभावाची वागणूक नाही

इस्लामाबाद: धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत पाकिस्तानची भूमिका निष्पक्ष नाही म्हणून त्यांना या बाबतीत काळ्या यादीत टाकण्याचा जो निर्णय अमेरिकेने घेतला आहे तो पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरीत आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. अमेरिकेने मंगळवारी ही ब्लॅकलिस्ट देशांची यादी जारी केली त्यात त्यांनी चीन, सौदी अरेबिया, आणि पाकिस्तान सह अन्य सात देशांचा समावेश केला आहे. धार्मिक स्वातंत्र्य या विषयावर अमेरिकेचा जो वार्षिक अहवाल सादर झाला आहे त्यात पाकिस्तान अन्य धर्मियांच्या बाबतीत सहिष्णु नाही असे मत स्पष्टपणे व्यक्त करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापी अमेरिकेचा हा निर्णयच पक्षपातीपणा करणारा आहे आणि हा अहवाल तयार करणाऱ्या स्वयंघोषित ज्युरींच्या निष्पक्षतेवरच संशय निर्माण करणारा हा अहवाल आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानातील एकूण लोकसंख्येपैकी चार टक्के लोकसंख्या ही अन्य धर्मियांची आहे त्यात ख्रिश्‍चन, हिंदु, शिख, बौद्ध या धर्माच्या लोकांचा समावेश असून या लोकांना कोणत्याही भेदभावाची वागणूक पाकिस्तानात देण्यात येत नाही असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना पुर्णपणे मानवाधिकार येथे उपभोगता येतात असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतच इस्लामोफोबियाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असून त्याच भावनेने त्यांनी आमच्यावर हे आरोप केले आहेत असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)