#SAvPAK : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

जोहान्सबर्ग – उस्मान खानची शानदार गोलंदाजी आणि इमाम-उल-हकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेशी 2-2 ने बरोबरी साधत मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे.

दरम्यान पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 41 षटकांत 164 धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून हाशिम आमलाने 59 आणि फाफ डू प्लेसी 57 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून गोलंदाजीत उस्मान खानने सर्वाधिक 4 विकेटस घेतल्या तर शाहीन अफरीदी आणि शादाब खानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठीचे 165 धावांचे आव्हान पाकिस्तानने 2 विकेट गमावत 31.3 षटकांत 168 धावा करत पूर्ण केले. पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने सर्वाधिक 71 धावा केल्या. फखर जमान 44 धावांवर बाद झाला. तर बाबर आजमने नाबाद 41 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आफ्रिकेकडून इमरान ताहिर आणि एन्डिले फेहलुकवेओने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)